परशुराम एक चिरंजीव व्यक्तिमत्व – श्रीधर जोशी

जय परशुराम एक चिरंजीव व्यक्तिमत्व

येत्या ७ मे ला म्हणजेच वैशाख शु त्रितिया  म्हणजेच अक्षय त्रितिये ला परशुराम जयंती आहे सप्त चिरंजिवां पैकी एक व विष्णूंचा मानला गेलेला सहावा अवतार ! ! ,हा उत्सव  संपूर्ण देशभर, पण केवळ मूठभर समाजात  साजरा केला जातो, खरं म्हणजे चारही वेद, अस्त्र शस्त्र विद्येत प्रारंगत असलेल्या, व संपूर्ण जनमानसा साठी कार्य करणारा एक शास्रज्ञ, ऋषी अशी जाची ओळख असावी, त्या  व्यक्तिमत्वाला सत्तेच्या दलालांनी  जातीच्या खिडकीत बंदिस्त करून, त्याने मांडलेल्या निर्भयता, विद्याननिष्ठता,स्वाभिमान या सारख्या प्रखर तेजयुक्त मांडलेल्या विचारामुळे  आपली सत्तेची आसने डळमळीत होऊ नये म्हणून ही काळजी त्यांनी घेतली असावी ,तशी ती प्रत्येक विचारवंत देशभक्त ,क्रांतिकारक याच्या बाबतीतही नेहमीच घेतली गेली.   प्रत्येकाला कुठल्यातरी जातीच्या खिडकीत अडकवलं की तत्कालीन  सत्ताधारी निर्धास्त होतात हे त्यांना गवसलेलं सत्य होतं

मनुष्याने शात्राबरोबर अस्त्र व शस्त्र विद्येत पारंगत असलं पाहिजे असा विचार मांडणारा परशुराम हा पहिला व्यक्ती असावा शक्ती शिवाय विद्ववत्तेला अर्थ नाही हे त्याने जगाला पटवून दिले  काळाला अनुसरून अस्त्र शस्त्र व  युद्धकला युद्धनीती ची मांडणी पशुरामने केली आपल्याला ज्ञात असलेल्या इतिहासात, त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे आर्य चाणक्याने ते समप्रमाण सिद्द करून दाखवले.  त्याचाच कित्ता गिरवत पुढे मंगल पांडे ,वासुदेव फडके ,आणि सावरकर बोस यासारखे अनेक महान स्वातंत्र सेनानी याच मार्गाने पुढे आले .

पण ज्या ज्या वेळी परशुरामांची ओळख द्यायची वेळ आली त्या त्या वेळी मात्र २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असा शब्दशः उल्लेख करून या महान व्यक्तिमत्वाला संकुचित करण्यात आलं आहे ,पुढेही अनेकांच्या वाट्यालाही  ते आलंच मग ते,बाजीराव असो फडके असो वा सावरकर असो बाजीराव म्हंटल की  आठवते ती फक्त मस्तानी त्याने  जिकंलेल्या ४० लढाया नाही सावरकर  म्हंटल की आठवते ते फक्त ब्रिटिश सरकारला दिलेलं अभिवेदन काही तथाकथित विचारवंतांच्या मते ‘माफी ‘पण मोर्सेलिसच्या सागरात त्यांनी मारलेली  उडी नाही. म्हूणन परशुरामासारख्या महान व्यक्तिमत्वाला केवळ ब्राम्हणांचा देव ठरवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या या व्यक्तिमत्वाला  शस्त्रसज्ज पण एका लहान फोटोत बंदिस्त करून टाकलं, त्याने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय  असा शब्दशः अर्थ घेऊन त्याला क्षत्रियाचा शत्रू ठरवून मोकळे झाले वास्तविक अनेक क्षत्रियांना परशुरामांनी विद्यासंप्पन केलं त्यातली दोन मोठ्ठी नाव म्हणजे भीष्म आणि कर्ण आणि २१ वेळा निर्वंश हे पूर्ण  सत्य नाही  सत्ता म्हंटली  कि अहंकार, मद,हा आलाच आणि मग अत्याचार हे ठरलेलंच तेव्हा ज्या ज्या वेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांमध्ये हा अहंकार  मद निर्माण झाला त्या त्या वेळी त्या सत्ताधार्यांना नीतिधर्माप्रमाणे वागण्यास प्रसंगी शस्त्र विद्येचा वापर करून बाध्य करणे एव्हढंच कार्य परशुरामांनी केलं यदा यदा हि धर्मस्य हे कृष्णाने पुढे महाभारतात सांगितलं असलं तरी विष्णू अवताराचा मुख्य उद्देश आधीच निश्चित झाला होता .

सामाजिक आस्तेबद्दल बघायचं झालं तर त्या काळात कुठलीही चूक नसतांना अंबे वर झालेल्या अन्याविरुद्ध एका बलवान सत्ताधार्याला आव्हान देणारा परशुराम हा एकटाच होता , दुसरी कथा चितेतुन ब्राम्हण उठवल्याची तीहि तशीच काल्पनिकच  वास्तविक परशुराम हे जगत्कार्याकरिता उत्तरेकडून दक्षिणेकडे समुद्र काठानी प्रवास करीत वाटेतील लोकांना ज्ञानसंप्पन करीत कोकण स्थानी आले कोकणातील एकूण जमीन हि उंचसखल पाऊस खूप पण पाऊस संपला कि लगेच दुष्काळ पाणी सगळं समुद्रात वाहून जाणार शेती करणे अशक्य अशावेळी मासेमारी न करु शकणारे लोक खूप हाल अपेष्ठाचे जिवन जगत होते जणू केवळ चितेवर जाण्याच्या लायकीचे उरले होते  तेव्हा परशुरामांनी त्या कोकणवासीयांना जमिनीचं शास्त्र शिकवलं बांध घालून भात शेती शिकवली, त्या जमिनीत व वातावरणात  वाढणाऱ्या  फळझाडांच्या उपयोग सांगितला  हळूहळू तो समाज त्या गर्तेतून बाहेर आला म्हणजेच जणू चितेतून परत आला म्हणून ते चित्पावन

अशा बुद्धिमान पण अर्थ आणि शक्तिहीन समाजाला स्वाभिमानाने व निर्भयतेने जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या महान शास्त्रज्ञाची आठवण केवळ चार भिंतीच्या आत व्हावी  हे योग्य नाही हि आठवण जातीयतेच्या खिडक्या तोडून  उघड्या आकाशाखाली संपूर्ण जनमानसाच्या साक्षीनेच झाली पाहिजे हाच त्यांच्या कार्याचा गौरव होईल .

  • श्रीधर जोशी  अमरावती

दि ०१/०५/२०१९