मिठाची बाहुली आणि वामपंथी

वामपंथी विचार मानणारे बुद्धिजीवी आणि पत्रकारांचे वैशिष्ट्य असते की ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. आधीपासून निश्‍चित विषयसूचीच्या (अजेंडा) परिघात राहूनते असत्याला सत्य म्हणून प्रचारित करणे किंवा काही प्रश्‍न उपस्थित करून भ्रम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत राहतात. तो तत्काळ प्रभावी दिसत असला तरी अंतत: सत्याचाच विजय होत असतो. याचे एक ताजे उदाहरणनुकतेच एका इंग्रजी नियतकालिकेत संघाच्या सेवाकार्यावरून आलेल्या वृत्तकथेत बघायला मिळाले.

कोरोना विषाणूच्या या अभूतपूर्व संकटकाळीशासकीय आणि निम-शासकीय कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाचा फार मोठा वर्गआपले प्राण संकटात टाकून संपूर्ण देशातपहिल्या दिवसापासून सतत सक्रिय राहिला आहे. पूरभूकंपासारख्या इतर नैसर्गिक संकटाच्या वेळी मदत व बचाव कार्य करणे आणि या संक्रमणशील रोगाच्या काळातस्वत: संक्रमित होण्याची शक्यता असतानाही सक्रिय होणेफरक आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 4 लाख 80 हजार स्वयंसेवकांनी अरुणाचल प्रदेशापासून ते काश्मीर आणि कन्याकुमारीपर्यंत 85 हजार 701 स्थानांवर सेवा भारतीच्या माध्यमातून 1 कोटी 10 लाख 55 हजार परिवारांना आवश्यक अन्नधान्याच्या पिशव्या पोहोचविल्या आहेत. 7 कोटी 11 लाख 46 हजार भोजन-पुडेगरजूंना वितरित केले आहेत. लाखोंच्या संख्येत मुखाच्छादनाचे वितरणविविध राज्यांमध्ये राहणार्‍या दुसर्‍या राज्यातील 13 लाख लोकांची मदत, 40 हजार युनिट्स रक्तदानप्रवासी मजुरांच्या मदतीसाठी 1 हजार 341 केंद्रांच्या माध्यमातून 23 लाख 65 हजार प्रवासी मजुरांना भोजन तसेच औषधी व इतर वैद्यकीय मदतभटक्या जनजातीकिन्नरदेहविक्रयाचा व्यवसाय करणारेधार्मिक स्थानांवर परिक्रमावासींवर अवलंबित वानरादी पशुपक्षीगौवंश… या सर्वांची मदत केली आहे. अनेक ठिकाणी संक्रमित वस्तीत प्रत्यक्ष जाऊन स्वयंसेवकांनी मदत केली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार असोसर्व राज्यांमध्ये जिथे कुठे प्रशासनाने जी मदत मागितलीत्याची पूर्तता केली आहे. जमाव नियंत्रण (क्राउड मॅनेजमेंट)स्थानांतर करणार्‍या मजुरांची नावनोंदणी अशी असंख्य कामेप्रशासनाच्या आवाहनावरून ठिकठिकाणी केली आहेत. पुण्यात प्रशासनाच्या आवाहनावरून स्वयंसेवकांनी इतर स्वयंसेवी संस्थांच्या सोबतकोरोना रेड झोनमधील दाट लोकवस्तीत जाऊन, 1 लाख लोकांची तपासणी केली आणि संक्रमणाची शंका असलेल्या व्यक्तींना पुढच्या तपासणीसाठी प्रशासनाकडे सोपविले.

इतके व्यापक-विस्तृत सेवाकार्य संघाच्या स्वयंसेवकांनी केलेत्याचे त्रोटक वर्णनदेखील या इंग्रजी नियतकालिकेने केले नाही. कारणसंघाच्या चांगल्या कामाची माहिती देणे त्यांच्या विषयसूचीतच नसते. उलटसंघाच्या बाबतीत जितक्या चुकीच्या गोष्टी आणि खोटे हे वामपंथी सतत सांगत असतातत्या सर्वांचा उल्लेख सेवा कार्याची माहिती देण्याच्या आडून त्यांनी केला आहे. कुठेही संघाच्या अखिल भारतीय पदाधिकार्‍यांनी भेटून त्यांचे यासंदर्भात काय म्हणणे आहेहे विचारण्याचा पत्रकारितेचा धर्मदेखील त्यांनी पाळला नाही. अशा खोट्या बातम्या लिहितांना त्यांच्या आत्म्याला जराही संकोच झाला नसेल कातसेही हे वामपंथी धर्म किंवा आत्मा यांना कुठे मानतात?

या पत्रकारानेसंघाने सरकारी निधीचा उपयोग सेवा कार्य करण्यासाठी केलाहे आणखी एक असत्यकुठल्याही पुराव्याशिवाय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतुहे सांगितले नाही की जर सरकारनोंदणीकृत सेवा संस्थांच्या माध्यमातून सरकारी निधीचा विनियोग करत असेल तर त्यात चूक कायसंघाचे स्वयंसेवक समाजातून गोळा केलेल्या पैशाच्या आधारावरच इतक्या व्यापक प्रमाणात सेवा कार्य करीत असतात. हे सर्व सेवा कार्य नोंदणीकृत सेवा संस्थांच्या माध्यमातून चालताततसेच त्यांचे नियमित अंकेक्षणही (ऑडिट) केले जाते. केदारनाथमध्ये ज्यावेळी अचानक प्रचंड महापुराचे संकट आले होतेतेव्हाही समाजातून धन गोळा करून स्वयंसेवकांनी सेवा कार्य केले होते. त्यावेळी एम. डी. रामटेके नावाच्या एका व्यक्तीचे पत्र वाचण्यात आले. त्यात ते लिहितात- ‘‘मी आंबेडकरवादी आहे आणि संघाचा विरोधकही. डॉ. आंबेडकर भगवान बुद्धाचे आधुनिक अवतार आहेतअशी माझी श्रद्धा आहे. परंतुरा. स्व. संघाच्या सेवाकार्याने मी प्रभावित आहे. माझा अनुभव आहे कीतुम्ही जर संघाला सेवा कार्यासाठी 100 रुपये दिलेततर संघवाले त्यात स्वत:च्या खिशातून 10 रुपये टाकून 110 रुपये सेवा कार्यात लावतात. म्हणून तुम्ही निश्‍चिंतपणे संघाच्या सेवाकार्याला मदत करा.’’

सरकार जर सेवा संस्थांच्या माध्यमातून सेवा कार्यात मदत करीत असेल तर स्वयंसेवकांद्वारा संचालित नोंदणीकृत न्यासाने सरकारी अनुदान घेण्यात काय चूक आहेपरंतुतरीही या कोरोना महामारीच्या काळात जे सेवा कार्य स्वयंसेवकांनी केले त्यात सर्वाधिक धान्याच्या थैल्यांचे आणि भोजन-पुड्यांचे वितरण होते. केरळआसामनागालँडत्रिपुरा आणि मुंबईत एकूण 95 टन धान्य (अधिकतर तांदूळ) सरकारकडून नियत किमतीत खरेदी करून लोकांना वितरित करण्यात आले. केवळ झारखंडमधील एका संस्थेने (सर्वांगीण ग्राम विकास समितीखूंटी) 12 हजार भोजन-पुडे वितरणासाठी प्रती पुडा रुपये असे 60 हजार रुपये सबसिडी घेतली आहे. इतर कुठल्याही राज्यात संघाने सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत घेतली नाही. परंतुपत्रकारितेच्या आड संघाला बदनाम करण्याचे काही लोकांचे व्रतच आहे.

रिपोर्टमध्ये त्यांच्या प्रतिपादनाचे सार होते कीसेवा कार्याच्या आड संघ आपले हातपाय पसरविण्याची योजना करतो. कम्युनिझमचे मूळ सेमेटिक विचारांशी जुळले असल्यामुळेसेवा कार्याच्या आड कन्व्हर्जन करणार्‍यांप्रमाणेच त्यांचेही विचार असतातयात काही आश्‍चर्य नाही. भारतीय चिंतनया देशाचा समाज वैष्णव जन तो तेणे कहिएजे पीड पराई जाने रे’ या धर्तीवर चालतो. हे आम्ही सर्व जाणतोपरंतु यासोबतच हेही लक्षात ठेवले पाहिजे कीवामपंथींना भारतीय चिंतनाशी काहीही देणेघेणे नाही. कारण भारतीय चिंतनाचा आधार आध्यात्मिक आहे आणि वामपंथ आध्यात्मिकतेला मानतच नाहीत.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी 19 एप्रिल 2020 च्या उद्बोधनात स्वयंसेवकांना हेच आवाहन केले होते की, ‘‘प्रचार किंवा प्रसिद्धीचा विचारही मनात न येऊ देता केवळ आपलेपणाने यथाशक्ती सर्वांची मदत करायची आहे. एकान्तात साधना आणि अनेकान्तात सेवाहा संघाचा संस्कार आहे.’’ संघाची ही उज्ज्वल परंपराही राहिली आहे.

12 नोव्हेंबर 1996 रोजी रात्री हरयाणातील चरखी-दादरीजवळ सौदी अरब आणि कझाकिस्तान एअरलाईन्सची दोन विमाने हवेतच एकमेकांवर धडकली आणि आग लागून खाली पडली. दोन्ही विमानांत एकूण 351 प्रवासी होते. त्यात 300 मुसलमान व 12 ख्रिश्‍चन होते. अपघातानंतर त्वरित जिल्हा संघचालक श्री. जीतरामइतर स्वयंसेवक व डॉ. हेडगेवार चिकित्सालयातील डॉक्टर्स अपघातस्थळी पोहोचले. अंधारामुळे पेट्रोमॅक्स आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. सर्व मृतदेह तत्काळ भिवानीच्या रुग्णालयात पोहोचविण्यात आले. बातमी पसरताच सकाळ होता होता मृतकांचे कुटुंबीयपोलिस प्रशासनपत्रकार इत्यादी तिथे येऊ लागले. मृतकांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले. ज्यांची नेमकी माहिती मिळाली नाही अशा 76 मुसलमान व 3 ख्रिश्‍चनांच्या शवांना त्यांच्या त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार दफन करण्यात आले. यात स्थानिक मौलवी आणि मुंबईहून आलेल्या काही लोकांनी सहकार्य केले. तीन दिवसांनंतर 15 नोव्हेंबरला दादरीच्या मशिदीत आयोजित आभारप्रदर्शन सभेतजिल्हा संघचालक जीतराम यांना सन्मानित करण्यात आले. अधिकांश वृत्तपत्रांचे शीर्षक होते- मशिदीत खाकी निकर व भगव्या पट्टीचा सन्मान’.

अपघातस्थळी आलेले केंद्रीय विमान वाहतूक मंत्री इब्राहिम तसेच माजी केंद्रीय मंत्री कुरियन यांनी म्हटले- ‘‘तुमची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो.’’ सीकरचे जाफर अली आणि हाकिम खान यांनी म्हटले- ‘‘या खुदाच्या देवदूतांना न जाणे काय काय म्हटले जातेपरंतु आज हा भ्रम मिटला आहे.’’ पोलिस अधीक्षक मोहम्मद शकील यांचे म्हणणे होते- ‘‘संकटाच्या काळात सर्वाधिक सहकार्य संघवाल्यांचे राहिले. त्यांच्याकडून मला हीच अपेक्षा होती.’’ अशा प्रकारचे अगणित प्रसंग सांगता येतील. हे थोडे विस्ताराने यासाठी लिहिले कीसर्व वामपंथी अपप्रचाराला नाकारतस्वानुभवाच्या या प्रतिक्रिया खुद्द ख्रिश्‍चन-मुसलमान समाजाच्या आहेत. वामपंथी यात कुठला हेतू बघत असतीलहा प्रश्‍न आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते- ‘‘शिव भावनेने जीव-सेवा.’’ हिंदुत्व हेच शिकविते. स्वयंसेवक शाखेत हाच संस्कार ग्रहण करतात कीसेवा करतेवेळी कुणाची जातउपासनाविचारधारा काय आहे हे विसरूनआपलेपणाने यथाशक्ती सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वामपंथी विचार मानणार्‍यांचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे कीते स्वत:ला लिबरल म्हणजे उदार म्हणवून घेताना थकत नाहीत. वास्तवात ते असे अजिबात नसतात. उदारतेचा अर्थ आहे दुसर्‍यांचे विचार ऐकणे. ही पहिली पायरी आहे. नंतर त्या विचारांना समजून घेणे. त्यानंतर त्या विचारांशी सहमत अथवा असहमत होणे. सहमत असल्यास त्यांना मनोमन (प्रच्छन्न रीतीने) स्वीकारणे आणि त्याही पुढची पायरी आहे त्यांना जाहीर स्वीकारणे. त्याच्याही पुढच्या पायर्‍या आहेत- त्या विचारांचे समर्थन करणे आणि यथाशक्ती सहकार्य करणे. परंतुउदार म्हणविणारा वामपंथी विचारदुसर्‍यांचे ऐकतच नसतो. प्रसिद्ध समाजसेवक व मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. अभय बंग यांनात्यांच्या सेवाकार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने संघाच्या एका जाहीर कार्यक्रमातप्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. ते तिथे आले होते आणि त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले. परंतुया वामपंथी विचारांच्या लोकांना हे सहन झाले नाही. कारण ते डॉ. बंग यांना आपल्या गटातले मानत होते. डॉ. बंग यांनी या कार्यक्रमात जाण्याचा आपला निर्णय बदलावा म्हणून वामपंथींच्या साप्ताहिकात डॉ. बंग यांच्या विरोधात अनेक लेख लिहिले गेलेत. डॉ. बंग यांचे म्हणणे होते की, ‘‘संघाचे लोक माझी वैचारिक पृष्ठभूमी जाणत असूनही मला बोलावित आहेतयात संघाचा मोकळेपणा (उदारता) दिसतो. मी जे नेहमी बोलत आलो तेच तिथेही मांडणार आहे.’’ परंतु हे वामपंथी मानायलाच तयार नव्हते. कार्यक्रमानंतर डॉ. बंग यांनी आपल्या भाषणाची मुद्रितप्रतज्या साप्ताहिकात त्यांच्या विरुद्ध अनेक लेख प्रकाशित झाले होतेत्या साप्ताहिकाला प्रकाशित करण्यासाठी पाठविली. परंतु त्यांचे भाषण प्रकाशित झाले नाही. हा आहे वामपंथींच्या उदारतेचा खरा चेहरा!

अशाच प्रकारेजयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये संघाच्या अधिकार्‍यांना आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रण मिळाले तरत्याचा या (उदार?) वामपंथींनी जबरदस्त विरोध केला आणि शेवटी त्यांच्या काही मूर्धन्य नेत्यांनी संपूर्ण फेस्टिव्हलवरच बहिष्कार टाकला. सत्याचा सामना करण्यास वामपंथी इतके का घाबरतातकळत नाही.

या वामपंथींचे तिसरे वैशिष्ट्य आहे कीते संघाच्याविरुद्धकुठल्याही पुराव्याविनावास्तवाला न जाणतान थकता खोटा प्रचार करीत असतात. विद्वत्तेचा मुखवटा घालून आपल्याच लोकांनी प्रतिपादित केलेल्या असत्याचा आधार घेतवारंवार अनेक प्रकारांनी संघाच्या विरुद्ध तोच तो खोटारडेपणा पसरविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या आरोपांमध्ये- महात्मा गांधींच्या हत्येवरून संघावर बंदी घातली होतीहे मनुवादी- ब्राह्मणी वर्चस्ववादीमहिला-विरोधीसांप्रदायिकमुस्लिमविरोधीप्रगतिविरोधी आहेतअसल्या गोष्टी संघाच्या संदर्भात वारंवार म्हणत असतात. परंतुस्वत: संघाच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटणेस्वत: अनुभव घेण्याचा ते कधीही प्रयत्न करीत नाहीत. कारण ते प्रामाणिक नाहीत.

तीन वर्षांपासून एक ख्रिश्‍चन कुटुंब माझ्या संपर्कात आहे. प्रारंभी ते कट्टर संघविरोधी होते. काही कारणवश संपर्क झाला तेव्हा त्यांनी दीड तास मला खूप प्रश्‍न विचारले. त्यांना शेवटचा प्रश्‍न होता की, ‘‘मी नियमित चर्चमध्ये जाणाराख्रिस्ती धर्माचे पालन करणारा आणि मूर्तिपूजा न मानणारा आहे. तरीही मी संघाचा सदस्य बनू शकतो का?’’ मी म्हटले, ‘‘हो.’’ यानंतर त्यांची अनेकदा भेट झाली. एकदा त्यांनी विचारले की, ‘‘सर! संघात सर्वजण तुमच्यासारखे आहेत की तुम्ही अपवाद आहात?’’ हळूहळू परिचय वाढत गेला. आता ते म्हणतात की, ‘‘तुम्ही जे सांगता ते ख्रिश्‍चन समाजाला माहीतच नाही.’’ माझ्या प्रवासात अनेक स्थानी त्यांनी ख्रिश्‍चन समाजाच्या प्रमुख लोकांशी माझी चर्चा आयोजित केली. ख्रिश्‍चन समाजाचे लोक जेव्हा त्यांना भेटतात तेव्हा ते जाणीवपूर्वक संघाचा विषय काढतात. संघाचे नाव ऐकताच हे लोकसंघ ख्रिश्‍चनविरोधी असल्याचे सांगतात. हे ऐकल्यावर हा परिवार त्यांना तीन प्रश्‍न विचारतो.

1. आरएसएस ख्रिश्‍चनविरोधी आहेहे जे तुम्ही म्हणत आहाततो तुमच्या स्वत:चा अनुभव आहे का?

2. तुम्ही संघाचे एखादे साहित्य वाचले आहे का?

3. तुम्ही कधी संघाच्या ज्येष्ठ व्यक्तीला भेटले आहात का?

या तीनही प्रश्‍नांचे उत्तर नकारात्मकच येते. नंतर ते त्यांना स्वत:चा संघाविषयीचा अनुभव सांगतात आणि संघाचे काही साहित्य वाचायला देतात. त्यांनी त्यांच्या घरीच संघाची काही पुस्तके ठेवली आहेत. असा मोकळेपणा या वामपंथींबाबत शक्य नाही. ते थेट संपर्काला टाळतात. कदाचितइतक्या वर्षांपासून पाळलेला खोटारडेपणा उघड होईलअशी त्यांना भीती वाटत असावी.

विरोधी धारणा असूनही प्रामाणिकपणा असेल तर सत्य जाणल्यानंतर व्यक्ती आपले मत देखील बदलते. तामिळनाडूत द्रविड आंदोलनाबाबत सर्वांना माहिती आहे. तामिळनाडूतील उत्तर अर्काट जिल्ह्याच्या मडपल्ली गावात संघशाखेच्या वार्षिक उत्सवात द्रविड कळघम पक्षाच्या स्थानिक नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. त्यांनी होकार दिल्याचे सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ‘‘काही दिवसांपूर्वी मी शाखेवर हल्ला करून तिला बंद करण्यासाठी माझ्या लोकांना घेऊन आलो होतो. परंतुइथे आल्यावर मी पाहिले कीगावातील ब्राह्मण परिवारातील मुले आणि हरिजन वस्तीतील मुले आपापसात उत्साहानेजणू काही एकाच कुटुंबातील आहेत असेआनंदाने खेळत होते. मला खूप आश्‍चर्य वाटले आणि मी परास्त झालो (गॉट डिस्आर्मड्). आमच्या पेरियार यांचेही असेच जातिभेदरहित समाज निर्माणाचे स्वप्न होते. आम्ही तर त्याला साकार करू शकलो नाहीपरंतु तुम्ही ते करून दाखविले आहे. म्हणून तुमचे अभिनंदन करण्यासाठी मी तुम्हांसर्वांसाठी मिठाई आणली आहे.’’ परंतुया वामपंथी लेखक अथवा पत्रकारांकडून अशा प्रामाणिकतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहेअसा अनुभव आहे. हे लोक आपल्या स्वत:च्या अनुभवाच्या आधारावर काही लिहित नाहीत.

संघकार्याला समजून घ्यायचे असेल तर पश्‍चिमेकडील एकांगी विचारांना सोडूनभारतीय एकात्म दृष्टीने विचार कराल तरचभारताला आणि संघाला योग्य प्रकारे तुम्ही समजू शकाल. 2018च्या अ. भा. प्रतिनिधी सभेत संघाच्या एका ज्येष्ठ विचारक व कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘अभारतीय अथवा पश्‍चिमेकडील विचारांनी संघाला समजणे सोपे नाही. संघाला समजून घ्यायचे असेल तर ईशावास्योपनिषदाला समजून घ्यावे लागेल. त्यात परमतत्त्वाचे वर्णन करतानापरस्परविरोधी गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या परमतत्त्वाला या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी लागू होतात. तो श्‍लोक आहे-

तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके।

तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यत:॥

(तो हलत असतोतो हलतही नाही. तो दूर आहेतो जवळही आहे. तो सर्वांच्या आत आहेतो सर्वांच्या बाहेरही आहे.)

भौतिक शास्त्राच्या परमाण्विक कणांच्या (सब् अ‍ॅटोमिक पार्टिकल्स) संदर्भात हेसनबर्गचा सिद्धान्तही हेच म्हणतो. हे कणही आहेततरंगही आहेत. ते दोन्ही आहे. एका ठराविक वेळी ते काय असतात हे सांगणे अशक्यच आहे.’ हेच भारतीय दर्शन म्हणते.

भारतीय आर्ष दृष्टीच्या एकात्म व सर्वांगीण चिंतनाच्या आधारावरच तुम्ही भारताला आणि संघालाही समजू शकता. परंतुया आर्ष दृष्टीने विचार करताच तुमचे वामपंथी असणे समाप्त होऊन जाते!  कदाचित या भीतीनेच हे वामपंथीसंघाला प्रत्यक्ष जाणून घेण्यास कचरत असावेत. नाही तर त्यांचा शेवटसमुद्राची खोली मोजण्यासाठी समुद्रात उडी मारलेल्या आणि अजूनपर्यंत बाहेर न आलेल्या मिठाच्या बाहुलीसारखा होईल.

… … …

(पूर्वप्रसिद्धी : दैनिक तरुण भारत नागपूर. 9 ऑगस्ट २०२०)