जागतिक लोकसंख्या दिन-अशोक घाडगे

११ जुलै: – जागतिक लोकसंख्या दिन

 

जागतिक लोकसंख्या दिन हा  दरवर्षी ११ जुलै रोजी वाढत्या लोकसंख्येविषयी जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्या पासून उद्भवणाऱ्या समस्या या विषयी जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमाच्या संचालन परीषदेनी १९८९ साली या अभियानाची सुरुवात केली.११ जुलै,१९८९ ला जागतिक लोकसंख्या ही जवळपास ५०० कोटी होती.

या अभियानाव्दारें‌ कुटुंब नियोजनाचं‌ महत्त्व, लैंगिक समानता,माता व बाळाचं आरोग्य, गरीबी,आरोग्याचा हक्क, लैंगिक संसर्ग आदि विषयांचं महत्त्व, गंभीर विषयांवर माहितीची देवाणघेवाण होते.दरवर्षी हा दिवस विशिष्ट विषय (Theme) ठरवून आयोजित केल्या जातो.

२००१ चा विषय होता लोकसंख्या,पर्यावरण आणि विकास.

२००२ चा विषय होता गरीबी, लोकसंख्या आणि विकास.

२००५ चा विषय होता समानतेव्दारा सशक्तीकरण.

२०१२ चा विषय होता जननीं आरोग्य सेवा.

२०१८ चा विषय होता कुटुंब नियोजन व मानवी हक्क.

२०१९ चा विषय होता नियोजन,लोकांना सक्षम बनविणे, विकसनशील राष्ट्र.

जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात ११जुलै,१९८९ पासून झाली.त्या वेळेस जागतिक लोकसंख्या ही जवळ जवळ ५०० कोटी व भारताची लोकसंख्या ही ८४ कोटी होती. आज जुलै ,२०२० मधे जागतिक लोकसंख्या ही ७७१ कोटी तर भारताची लोकसंख्या ही १३० कोटी आहे.

लोकसंख्या वाढीला दोन कारणं आहेत. एक प्रजनन दरात वाढ व दुसरं मृत्यू दरात होणारीं घट.वैज्ञानिक प्रगतिमुळे मृत्यु दर कमी होत आहे परंतु वाढता प्रजनन दर रोखण्यात प्रयत्न कमी पडत‌ आहेत.

लोकसंख्या वृद्धीचीं मुख्यत्वे तीन कारणं‌ आढळून येतात.

(१) सामाजिक (२) आर्थिक (३) धार्मिक.

१.सामाजिक:- बालविवाहाची परंपरा, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, कुटुंब नियोजन व त्याविषयीचं अज्ञान.

२. आर्थिक:- गरीबी आणि रोजगाराचा अभाव. गरीब कुटुंबांमध्ये एक गैरसमज आहे की कुटुंबात जास्त सदस्य असल्यास कौटुंबिक उत्पन्नात सुद्धा वृद्धी होईल.

३. धार्मिक:- धार्मिक कारणांस्तव फारशी चर्चा होत नाही.भारतात मुख्यतः हिंदु, मुस्लिम व ख्रिश्चन असे तीन धर्म आहेत.शीख,जैन,बौद्ध हे हिंदू धर्माशीच निगडित पंथ आहेत.परंतु हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन या धर्मीयांच्या प्रजनन दरात कुठेच समानता नाही.त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचं‌ विश्लेषण धार्मिक आधारावर करणं आवश्यक आहे.

भारतातील पहिली जनगणना १८८१ साली तर अंतिम जनगणना २०११ साली झाली.१३० वर्षात झालेल्या १३ जनगणनांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे हिंदूंच्या लोकसंख्येत होणारी घट व मुस्लिम लोकसंख्येत होणारी वाढ.लोकसंख्येची आकडेवारी बघता १९४७ साली फाळणीनंतर भारतात ८४ टक्के हिंदू व १० टक्के मुस्लिम होते.परंतु २०११ च्या‌ जनगणनेत हे प्रमाण ७९% व १५% दिसून आले आहे.या जनगणनेत हे सुध्दा दिसून आलं की मुस्लिमांचा प्रजनन दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिकच आहे.एक स्त्री जितक्या अपत्यांना जन्म देते त्याला प्रजनन क्षमता म्हणतात.हिंदू प्रजनन दर हा २.२% तर मुस्लिमांचा दर हा ३.६% आहे. अर्थात मुस्लिम प्रजनन दर हा हिंदूंच्या दीडपट अधिक आहे.

मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीसाठी बहुपत्नीत्व, घुसखोरी,लव्ह जिहाद आदि कारणं दिली जातात.

भारतात जशी जनगणना होते तशीच चर्च कडूनही दर दहा वर्षांनी ख्रिश्चन धर्मियांची जनणना होते.ही आकडेवारी ख्रिश्चन विश्वकोष (World Christian encyclopaedia) व विश्व ख्रिश्चन सामान्य प्रवृत्ती (World Christian Trend) नामक पुस्तकांमध्ये प्रकाशित होतात.या पुस्तकाच्या आधारे भारतात ७% ख्रिश्चन आहेत व त्यांचा प्रजनन दर १.८% आहे.या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे.

वाढती लोकसंख्या ही देशासमोरील समस्या वाढण्याचं सुद्धा एक कारण आहे.एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक,आर्थिक व धार्मिक आधारावर वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्या सुद्धा भिन्न आहेत.

सामाजिक व आर्थिक कारणांमुळे वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्यांची चर्चा नेहमीच होते.जसे अन्न,वस्त्र,निवारा,पेयजल, पर्यावरण, बेरोजगारी इत्यादी.

धार्मिक कारणामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे.आज भारतात ५६ जिल्हे हे मुस्लिम बहुल आहेत तर २ जिल्हे ख्रिश्चन बहुल आहेत,जिथे फुटीरतावाद,‌ नक्षलवाद सारखे प्रश्न भेडसावत आहेत. नागालँड सारख्या ख्रिश्चन बहुल राज्यात “यू इंडियन गो बॅक” सारख्या घोषणा दिल्या जातात.मुस्लिम बहुल भागात हिंदू देवी देवतांच्या कार्यक्रमांवर‌ दगडफेक,तसेच पोलिस,सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले अशा घटना घडतच असतात.

वाढती लोकसंख्या हे भारतासमोर असलेलं एक मोठं आव्हान आहे.परंतु आव्हानांना संधी मध्ये परिवर्तित करणं हे भारतीयांचं कौशल्य आहे.वाढती लोकसंख्या ही श्रमिकांच्या निर्मितीचं कारण बनू शकते.आज भारतात ५६% तरुण आहेत.बहुदा जगाच्या तुलनेत भारतात अधिक तरुण आहेत.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास बेरोजगारीची समस्या नगण्य होऊ शकते.समस्या कमी होऊ शकतात म्हणून वाढत्या लोकसंख्येचा सर्वकष विचार होणं आवश्यक आहे.

तसेच आगामी पन्नास वर्षाचं (तत्कालिक नाही) धोरण सखोल विचार करून ठरवलं गेलं पाहिजे. लोकसंख्या शास्त्रीय (Demographic balance) संतुलन यांचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे.या विचारांचा आधार घेउन लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण ठरवलं पाहिजे,जे सरकारचं काम आहे.समान नागरी कायदा, घुसखोरी, धर्मांतरण आदि बाबत कायदे होऊन त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, केवळ कायदे वा धोरण बनवून ही समस्या सुटणार नाही.हा केवळ सरकारचा प्रश्न नसून प्रत्येक कुटुंबाचा, संपूर्ण समाजाचा आहे.त्यामुळे त्यावर साधकबाधक विचार करून समाजाचं प्रबोधन करणं आवश्यक आहे.

 

चला तर आपण सर्व जण मिळून या दृष्टीने विचार करु या.

 

  • अशोक घाडगे

महाल, नागपूर भ्रमणध्वनी ९७६६६९८०८१

संदर्भ:-

१.भारत का भविष्य,विमर्श प्रकाशन,.नई‌ दिल्ली, प्रथम संस्करण २०१८!

२.पाथेय,प्र- धर्म जागरण समन्वय, नागपूर महानगर,प्रथम आवृत्ती जुलै,२०१९.

३.लव जिहाद,प्र- नारी सुरक्षा अभियान समिती, नागपूर महानगर,प्रथम आवृत्ती सितंबर,२०१९.