ramnam hech satya- s alkari

*राम नाम सत्य आहे*

अयोध्या नगरी जन्मलेला राम हा महामानव  संपूर्ण विश्वासाठी एक आदर्श आहे .रामराज्य हजार वर्षे चालले म्हणून राम आदर्श आहे किंवा राम हा राजा होता म्हणून नव्हे तर राम हा त्यागामुळे व त्यानी संबंध मानवजातीला टाकून दिलेला आदर्श यामुळे राम मर्यादा पूरुषोत्तम व पूजनीय ठरला आहे .राज्यकारभार तर रामापेक्षा विक्रमादित्यासारखे अनेक राजांनी

उत्तम चालविले आहे .पण या जगात जनतेनी त्यागवृत्ती असणाऱ्या लोकांची दखल घेतली आहे .प्रभू रामाने उद्या राज्याभिषेक तयारी सुरू असताना थेट भरजरी वस्त्र सोडून वनवास पत्करला.  वडिलांच्या व सावत्र आईच्या ईच्छेनुसार कोणतीही तक्रार न करता आज्ञा शिरसांवद्य मानली. अयोध्येची सेना मागवू शकत असताना सुद्धा सिता अपहरणप्रसंगी वानरसेना उभी केली.हनुमानासारखे भक्त असताना लंकेत सोबत जाऊन सितेला अलगद आणता आले असते.पण या जगात अहंकारी,अन्यायकारी कितीही बलाढ्य असला तरी त्याला सबक शिकवायलाच हवा. जनतेच्या टिकेपायी पुन्हा एक त्याग श्रीरामाने झेलला सिता त्याग केला.अशी सर्व दुःखे सोसून सुखाचा त्याग करीत आदर्श रचला.आजही रामराज्याच्या संकल्पना आळवल्या जातात.महात्मा गांधीनी सुद्धा  रामराज्य ची संकल्पना अपेक्षिली होती.

रामाने त्यागाचा कळस केला.याचा अर्थ त्यांनी युगानुयुगे त्यागच करीत राहावा असेही होत नाही .परकीय आक्रमक बाबरने रामाचा जन्म जिथे झाला त्या वास्तूला खंडीत करून तिथे मस्जिद उभारली. आक्रमकच तो त्याच्या कडून काय दुसऱ्या अपेक्षा पुढे भारत स्वतंत्र झाला.गांधीजीं रामराज्य आले पाहिजे यासाठी आग्रही मात्र गेल्या सत्तर वर्षात ती विवादित भूमी म्हणून न्यायालयात रेंगाळत ठेवला गेला. वाद हिंदू मुस्लीम हा नव्हताच व नाही .कित्येकवेळी मुस्लीम लोकांच्या धर्मगुरूंनी मंदिर उभारावे अशी भूमिका घेतली.पण खरा प्रश्न होता भारताच्या विवादित धर्मनिरपेक्षतेचा.मुस्लीम मतांसाठी मुस्लिमांनाच उकसवणारे यांचाच खरा विरोध होता.

राम जिथे जन्मला तिथेच मंदिर का आवश्यक असेही प्रश्न विचारले जातात.तर मुस्लीम जनता फक्त उपरवाल्याला मानते.मुर्तीपूजक नाहीत फक्त पश्चिम दिशेला मक्का असल्याने पश्चिम दिशेस तोंड करुन नमाज अदा केला जातो.भाविक एकत्र यावेत यासाठी मस्जिद बांधलेली असते.पण मस्जिद पवित्र वास्तू म्हणून मानली जात नाही .पवित्र वास्तू म्हणून मस्जिदला मानले असते तर मक्का शहरात जगातून अनेक भाविक मोठ्या प्रमाणात येतात यांच्या सोयीसाठी अनेक आजुबाजूच्या मस्जिद पाडल्या गेल्यात.यापैकी काही तर खुद्द मं.पैगबंरसाहेब सुद्धा जिथे नमाज पडत होते त्यासुध्दा पाडल्या व रस्ते मोठे केले.मग भारतातच एका परकीय आक्रमक बाबरला मं.पैगंबरसाहेबांपेक्षा अवाजवी महत्त्व का देण्यात येत आहे .हा कुटील राजकीय डाव मुस्लीम नेत्यांना सुद्धा कळला व त्यांनीच मंदिर उभारण्यात पुढाकार घेण्याची घोषणा सुद्धा केली.हा मुद्दा विवादित नव्हताच एवढे पुरावे मंदिराचे आहेत.तिथे रामललेच्या मुर्त्या सुद्धा अनेक वर्षापासून ठेवल्या आहेत .मं.पैगंबरसाहेबांनी मस्जिदबाबत स्पष्ट म्हटले आहे की विवादीत स्थळी नमाज पडू नये तरी सुद्धा हा घोळ चालविला गेला.

राम हा फक्त हिंदुचाच असेही नाही कित्येक मुस्लीम रामभक्त आहेत .ईंडोनेशिया मुस्लीम बहुल देश येथे आजही रामलिला साजरी केली जाते.कट्टर मुस्लीम असताना ते रामभक्त आहेत.तेथील मुस्लीम म्हणतात धर्म बदलला जाऊ शकतो पण संस्कृती ,आदर्श कसे बदलणार.आमचा राम भारतीयांनी पळविला असे ते म्हणतात .तेथील नोटांवर गणपतीचा फोटो आहे .एवढेच काय पॕलेस्टाईन देश शंभर टक्के मुस्लीम असलेला हा देश यांनी एवढयातच राजधानी शहराचे नाव रामल्लाह ठेवले.रामल्लाह मधील राम फक्त हिंदुचे दैवत नसून समस्त विश्वाचे आहे .मुस्लिमांच्या पवित्र महिन्याला रामदान म्हटले जाते.कदाचित राम नावाने हा दान करण्याचा महिना असावा.मुस्लीम व संत कबीर राम रहिम मानायचे.रामाला मुस्लीम लोकांनी रहिम म्हटले आहे .थोडा फरक पण शेवटी भाव तर तोच आहे .ज्या गोष्टीत राम नाही त्याला हराम म्हटलं जाते. वाल्याचा वाल्मिकी सुद्धा राम नामाने होतो.एवढे राम नामात सत्व आहे .म.गांधीनी जग सोडताना हे राम म्हटले आहे.

राममंदिराची आवश्यकता का…असा प्रश्न विचारला गेला तर महामानवांची स्मारके पिढ्यानपिढ्या आपल्याला त्यांची महती सांगून आदर्श जीवन कसे जगावे त्याचे मार्गदर्शन करीत असते.आता बघाना पाकिस्तानमधे लाहोरला भगतसिंह चौक होता.स्वातंत्र्यानंतर त्यांनी नाव बदलले पण मागील काही वर्षात त्यांनी भगतसिंह अपना बेटा है म्हणत परत त्या चौकाचे नामकरण भगतसिंह चौक केले..पणिनी एक व्याकरणकार होऊन गेले यांची मुर्ती पाकिस्तान येथील प्रसिध्द ग्रथांलयामधे मध्यभागी विराजमान आहे .भारताने ती मागितली तर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.तो आमचा माणूस आहे ..तो आमचा आहे हे अप्रुप आपल्या भुमीची महती सांगतो तसेच आमच्या भुमीची प्रगल्भता दर्शवितो.याचमुळे आपणआज कोणताही शोध अथवा शोधकर्ता आमचा म्हणताना स्वाभिमान उंचबळून येतो.आदम व हवा जे जगातील आद्य जोडपे मानले जाते..ते सुद्धा अयोध्येतील असे काही विदेशी मानतात.राम व अयोध्या संपूर्ण विश्वासाठी महत्त्वपूर्ण आहे.तेंव्हा मुस्लीम जनता व नेत्यांनी मोठ्या मनाने रामजन्मभूमी ला विवादीत न समजता हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय समजून भडकावू व्यक्तव्य करु नये किंवा कुठेही गालबोट लागू नये अशी कृती करू नये.कोर्टाने दिलेल्या निकालाचा सन्मान राखून सामंजस्य ठेवावे.समाजात काही भडकावू प्रवृत्या असतात त्यांना चांगल्या लोकांनी रोकले पाहिजे .

आम्ही रामाला प्राणतत्व मानतो..म्हणून हिंदू  च्या अंत्ययात्रेत राम नाम सत्य आहे …असे म्हणत शेवटचा श्वास घेतो.

—       संजय अलकरी,अमरावती

9028227580