हे केवळ मंदिर नाही…

अयोध्येतील रामजन्मभूमीवर कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धा व आकांक्षेचे प्रतीक असलेल्या श्रीराममंदिराच्या निर्माणाचा शुभारंभ ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हे पर्व सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. 1951 मध्ये सौराष्ट्रच्या (गुजरात) वेरावलमध्ये सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्वतंत्र भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली होतीतसाच हा प्रसंग आहे. त्या वेळी सरदार पटेलकन्हैयालाल मुन्शीमहात्मा गांधीव्ही. पी. मेननडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्सारख्या मूर्धन्य नेत्यांनीसोमनाथ मंदिराच्या निर्माणकार्याला भारतीयांची चिरविजयी अस्मिता व गौरवाचे प्रतीक मानले होते. परंतुपंडित नेहरूंसारख्या नेत्याने या घटनेला हिंदु पुनरुत्थानवाद’ संबोधून विरोधही केला होता. त्यावेळी नेहरूंशी झालेला वादकन्हैयालाल मुन्शी यांनी त्यांच्या पिलग्रिमेज टू फ्रीडम’ या पुस्तकात नोंदविला आहे. हे प्रकरण वाचण्याजोगे आहे. कारण तेव्हाच आम्हीअयोध्येत निर्माण होत असलेल्या राममंदिराचे भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील महत्त्व आणि त्याच्या विरोधालाही समजू शकू.

अयोध्येतील राममंदिराप्रमाणेचसोमनाथ मंदिरावर देखील एक मुस्लिम आक्रमक- महमूद गझनीने अनेक वेळा हल्ले केले आणि त्याला नष्ट केले होते. त्यामुळे कन्हैयालाल मुन्शींच्या पुस्तकातील उद्धृत अंशआजच्या संदर्भातही सांस्कृतिक वारशासाठीराष्ट्रभावनेसोबत राजकारणाच्या संकीर्णतेलाही रेखांकित करणारा आहे.

 

अस्मितेवर आघात व जनसामान्यांची वेदना

आक्रमक कुठल्याही राष्ट्राला केवळ पायांनी तुडवत नाहीततर पराभूत समाजाचा गौरव आणि आत्माभिमानालाही खोलवर चिरडून टाकीत असतात. प्रश्‍न हा आहे कीतो ढाँचा ज्याला नंतर मशीद म्हटले गेलेमुळात प्रार्थनेसाठीच बनला होता कानाही. बाबरचा सेनापती मीर बाकीला अयोध्या जिंकल्यानंतर जर नमाजच अदा करायची होता तर तो कुठेही खुल्या मैदानात अथवा मोकळ्या जागी नवी मशीद बनवून करू शकत होता. इस्लामी विद्वानांनी सर्वोच्च न्यायालयात मान्य केले कीबळजबरीने बळकावलेल्या जमिनीवर अथवा इमारतीत केलेला नमाज अल्लाला मान्य नसतो. म्हणून मीर बाकीचे श्रीराममंदिर उद्ध्वस्त करून तिथे मशीद बांधण्याचे कृत्यना त्याची धार्मिक गरज होतीना ही त्याला इस्लामची मान्यता होती. मग त्याने हे का केलेकारणत्याला केवळ भारतीय श्रद्धाअस्मिता आणि गौरवावर आघात करायचा होता.

कन्हैयालाल मुन्शी लिहितात- ‘‘… डिसेंबर 1922 मध्ये मी त्या भग्न मंदिराच्या तीर्थयात्रेवर निघालो. …अपवित्रजळालेले आणि धस्तपरंतु तरीही ते दृढपणे उभे होतेजणू काही आमच्याशी केली गेलेली कृतघ्नता आणि अपमानाला न विसरण्याचा संदेश देत असावे. …मी जेव्हा पवित्र सभामंडपाकडे पाऊल टाकले तर मंदिराच्या स्तंभांचे भग्नावशेष आणि विखुरलेल्या शिळांना बघून माझ्या मनात अपमानाची कसली अग्निशिखा प्रज्ज्वलित झालीमी सांगू शकत नाही.’’

सांस्कृतिक वारसा केवळ भौतिक प्रतीक नसतो. सामाजिक मूल्ये आणि परंपरांमध्ये गुंफलेली सूत्रे असतातज्यात समाजाला बांधण्याचीउत्साहित करण्याची शक्ती असते.

कन्हैयालाल मुन्शी लिहितात- ‘‘नोव्हेंबर 1947च्या मध्यात सरदार (पटेल) प्रभासपाटणच्या दौर्‍यावर होते. तिथे त्यांनी मंदिराचे दर्शन घेतले. एका सार्वजनिक सभेत सरदारांनी घोषणा केली कीनव्या वर्षाच्या या शुभ प्रसंगी आम्ही निर्णय घेतला आहे कीसोमनाथचे पुनर्निर्माण केले पाहिजे. सौराष्ट्राच्या लोकांनी आपले सर्वश्रेष्ठ योगदान दिले पाहिजे. हे एक पवित्र कार्य आहे आणि यात सर्वांनी भाग घेतला पाहिजे.

ज्यांना मृत दगड जिवंत स्वरूपाच्या तुलनेत अधिक प्राणवान वाटतात अशा काही लोकांनीप्राचीन मंदिराच्या भग्नावशेषांना प्राचीन स्मारकाच्या रूपात जपून ठेवण्याची सूचना केली आहे. परंतु माझे स्पष्ट मत आहे कीसोमनाथचे मंदिर काही प्राचीन स्मारक नाही. उलट ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थित पूजास्थळ होतेज्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी संपूर्ण राष्ट्र प्रतिबद्ध होते.’’

 

राष्ट्रीय विषयांवर मतभिन्नता व त्याची कारणे

त्यावेळीदेखील आमचे अखिल भारतीय नेते दोन वेगवेगळ्या विचारांमध्ये विभागले होते. सामाजिकराष्ट्रीय महत्त्वाच्या काही मुद्यांवर बर्‍याच वेळा राजकारणाची वेगवेगळी मते आणि पक्ष बघायला मिळतात. याचे कारणराष्ट्र आणि समाजाबाबत राजकारणाचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. सोमनाथबाबत नेहरूजींचा दृष्टिकोन अथवा अयोध्येबाबत आज उठणारे विरोधाचे किरकोळ आवाजयाच संदर्भात पाहता येतील.

कन्हैयालाल मुन्शी लिहितात- ‘‘…कॅबिनेट बैठकीच्या शेवटी जवाहरलाल यांनी मला बोलावून म्हटले- सोमनाथच्या पुनरुद्धारासाठी करण्यात येणारे तुमचे प्रयत्न मला पसंत नाही. हा हिंदू पुनरुत्थानवाद आहे. मी उत्तर दिले कीमी घरी जातो आणि जे काही घडले त्याबाबत तुम्हाला माहिती देतो.’’

प्रश्‍न हा आहे कीभारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी याला हिंदू पुनरुत्थान कार्य’ म्हणत विरोध का केलाउलटकन्हैयालाल मुन्शी यांनी याला भारताची सामूहिक अंत:चेतना’ असे नाव दिले आणि या प्रयत्नांवरून सामान्य लोकांमध्ये प्रचंड आनंद असल्याचा संकेत दिला. एकाच मुद्यावर दोन वेगवेगळे विरोधी दृष्टिकोन का तयार होतातमूलत: हे भारताचे दोन वेगवेगळे विचार आहेत. पंडित नेहरू भारतविरोधी नव्हतेपरंतु भारताच्या संदर्भात त्यांची दृष्टी युरोपीय विचारधारेवर केंद्रित होती. हा विचार भारतीयतेहून वेगळी होताअभारतीय होता. उलटसरदार पटेलडॉ. राजेंद्र प्रसादकन्हैयालाल मुन्शी आणि इतर लोकांचे भारतासंबंधी विचारभारतीयतेच्या मातीशी जुळलेले होते. त्यात भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरेचे सार निहित होते. इतकेच नाही तरमहात्मा गांधींनी देखील याला मान्यता दिली होती.

कन्हैयालाल मुन्शी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात- ‘‘…जेव्हा सरदार पटेलांनी बापूंसोबत (गांधीजी) संपूर्ण योजनेवर चर्चा केलीतेव्हा त्यांनी म्हटले कीहे अगदी योग्य आहे. फक्त मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आवश्यक धन जनतेच्या सहकार्याने गोळा करण्यात यावे. गाळगीळ यांनीही बापूंची भेट घेतली आणि बापूंनी त्यांनाही हाच सल्ला दिला. त्यानंतर मंदिर पुनर्निर्माणासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदतीच्या चर्चेवर पूर्णविराम लागला.

मी तुम्हाला खात्री देतो कीभारताची सामूहिक अंत:चेतना’ कुठल्या दुसर्‍या कार्याच्या तुलनेत सोमनाथच्या पुनर्निर्माणासाठी भारत सरकारचे समर्थन आहेहे ऐकून अधिक आनंदी आहे.

‘‘…काल तुम्ही हिंदू पुनरुत्थानाच्या संदर्भात गोष्ट काढली. मला तुमचे विचार माहीत आहेत. मी नेहमीच त्यांचा सन्मान केला आहे. …मी माझ्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या काही पैलूंची आलोचना करीतत्यांना नव्या रूपात बदलण्याचे विनम्र निवेदन केले आहे. हे लहानसे पाऊलच आधुनिक वातावरणात भारताला एक उन्नत व सशक्त राष्ट्र बनवू शकतेहा विश्‍वास त्या निवेदनामागे होता.

‘‘…एक गोष्ट आणखी सांगू इच्छितो कीभूतकाळावरील माझा विश्‍वास मला वर्तमानात काम करण्यास तसेच भविष्याकडे अग्रेसर होण्याची शक्ती देत आहे. जे आम्हाला भगवद्गीतेपासून वंचित करेल किंवा आमच्यासारख्या लाखो लोकांच्या मनात मंदिराप्रति असलेल्या श्रद्धेला निखंदून टाकेल आणि आमच्या जीवनाच्या मूलभूत स्वरूपालाच नष्ट करेलअशा स्वातंत्र्याची माझ्या दृष्टीने काही किंमत नसेल.

‘‘…मला जाणवते आणि माझा पूर्ण विश्‍वास देखील आहे कीज्यावेळी हे मंदिर आमच्या जीवनात त्याच्या पूर्ण गौरवाने आणि श्रद्धेसह स्थापित होईलत्यावेळी लोकांना धर्माची अधिक सुयोग्य अवधारणा आणि आपल्या शक्तीच्या सुस्पष्ट चेतनेची अनुभूती प्राप्त होईलजी स्वातंत्र्यानंतरच्या या वर्तमान काळात आणि स्वातंत्र्याचे परिणाम तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

माझे पत्र वाचल्यानंतर राज्य मंत्रालयाचे सल्लागार व्ही. पी. मेनन यांनी मला पुढील उत्तर पाठविले-

‘‘मी तुमचे सुंदर पत्र वाचले. तुमच्या पत्रात व्यक्त तुमच्या दृष्टिकोणानुसार जगण्यास किंवा गरज पडली तर त्यासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार राहणारी मी कदाचित ती व्यक्ती आहे.’’

सोमनाथमध्ये प्राणप्रतिष्ठेची वेळ आलीतेव्हा मी राजेंद्र प्रसाद यांच्याशी (भारताचे तत्कालीन राष्ट्रपती) संपर्क केला आणि त्यांना समारोहाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. परंतुमी त्यांना हेही सांगितले कीजर त्यांनी माझे निमंत्रण स्वीकारले तर त्यांना (कुठल्याही परिस्थितीत) यावेच लागेल.

माझी शंका खरी ठरली. डॉ. राजेंद्र प्रसाद मंदिराच्या उद्घाटनाला येणार असल्याचे जाहीर होताचजवाहरलाल यांनी त्यांच्या सोमनाथला जाण्याला विरोध केला. परंतुराजेंद्र प्रसादांनी आपले वचन पूर्ण केले. सोमनाथमध्ये दिलेल्या त्यांच्या भाषणाला सर्व वृत्तपत्रांनी प्रकाशित केले होते. परंतु हे भाषण सरकारी विभागांच्या दस्तावेजात नोंदविण्यात आले नाही.’’

 

भारतात उदारता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचा दंभ मिरविणार्‍यांनीभारताच्या महामहिम राष्ट्रपतींच्या भाषणाला सरकारी विभागांच्या दस्तावेजांमधून हटवून टाकले होते. ही किती विडंबना आहे नाही! नेहरूंसह देशात अनेक व्यक्ती सोमनाथ मंदिराच्या निर्माणाला विरोध करीत होत्यापरंतु त्याचवेळी महात्मा गांधीजींसह अखिल भारतीय स्तरावरील अनेक मोठ्या नेत्यांनी याचे समर्थन केले होते. त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज देशभरातील लाखो श्रद्धाळूएका भव्य व अद्भुत मंदिराच्या दर्शनासाठी सोमनाथला येत असतात.

60 वर्षांपासून एकाच राजकीय पक्षाचे निरंतर सरकार राहिल्यामुळे या अनुदार धारणेलाच सरकारद्वारा संरक्षणपोषण आणि समर्थन मिळाल्यामुळे बौद्धिक क्षेत्रशैक्षणिक संस्था आणि मीडियामध्ये भारताची हीच अभारतीय अवधारणा प्रतिष्ठित करण्यात आली. म्हणून अयोध्येत राममंदिर निर्माणाच्या विरोधात उठणारे आवाजमीडिया व बौद्धिक क्षेत्रात अधिक कर्कश दिसून येतात. परंतुभारताच्या भारतीय अवधारणेला मनापासून मानणारेभारताच्या एकात्म व समग्र आध्यात्मिक परंपरेशी खोलवर जुळलेले आणि भारताच्या सामूहिक अंत:चेतनेच्या अनुरूप असणारे कोट्यवधी भारतीय आहेत. सरदार पटेलकन्हैयालाल मुन्शीडॉ. राजेंद्र प्रसादमहात्मा गांधीडॉ. राधाकृष्णन्पंडित मदनमोहन मालवीय आणि आधुनिक स्वतंत्र भारतातील अनेक दिग्गज राष्ट्रनिर्मात्यांनी आपल्या वाणी व आचरणानेभारताची ही अंत:चेतना अभिव्यक्त केली आहे.

साररूपात सांगायचे झाले तरअयोध्येतील राममंदिर निव्वळ एक मंदिर नाही. ते कोट्यवधी भारतीयांच्या कालजयी श्रद्धा व गौरवाचे प्रतीक आहे. म्हणून त्याचे पुनर्निर्माण भारताच्या सांस्कृतिक गौरवाची पुनर्स्थापना आहे.

5 ऑगस्ट 2020 ला या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक गौरवस्थानासमान राममंदिराच्या निर्माणाचे शुभ कार्य सुरू होत आहे. भारतातीलच नाहीतर जगभरातील कोट्यवधी भारतीय वंशाचे लोक दूरदर्शनद्वारा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतील. कोरोना काळातील मर्यादांना लक्षात घेऊनहा कार्यक्रम मर्यादित संख्येत आयोजित केला जाईल. मंदिर निर्माण न्यासाचे विश्‍वस्त देखील याला केवळ एक मंदिर नाहीतर भारताच्या कालजयी सांस्कृतिक प्रतीकाच्या आणि गौरवाच्या पुनर्स्थापनेच्या रूपातच बघत असतीलअसा मला विश्‍वास आहे. माझ्या माहितीनुसारम्हणून या न्यासाच्या विश्‍वस्तांनीभारताच्या सर्व वर्गांतील प्रातिनिधिक महानुभावांना या देदीप्यमान प्रसंगाचे साक्षीदार होण्यास निमंत्रण पाठविले आहे. यात भारतातील सर्व मत-पंथांचे संतमहंतमठाधीशआध्यात्मिक व्यक्तीजैनबौद्धशीखख्रिश्‍चनमुस्लिमअनुसूचित जाती/जनजाती इत्यादी सर्वांच्या प्रतिनिधींना याचे निमंत्रण गेले असावे. हे मंदिर भारताच्या सांस्कृतिक गौरवाचे प्रतीक आहेकेवळ एक मंदिर नाही.

… … …

(पूर्व प्रसिद्धी तरुण भारत नागपूर, ५ ऑगस्ट २०२०)