पुदुच्चेरीस्थित श्री अरबिंदो आश्रमाची शताब्दीपूर्ती
पुदुच्चेरीस्थित श्री अरबिंदो आश्रम आज आपले शताब्दी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करीत आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने श्री अरबिंदो आश्रमाशी संबंधित सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. या आश्रमाने ‘पूर्णयोगा’चा (Integral Yoga) संदेश देण्यासाठी आणि जगभरात आध्यात्मिक चेतना जागृत करण्यासाठी ‘श्री माँ’ यांच्या दिव्य नेतृत्वाखाली अतुलनीय योगदान दिले आहे. भारताच्या आधुनिक आध्यात्मिक चळवळीचे एक संस्थात्मक केंद्र म्हणून या आश्रमाने शिक्षणाचा प्रसार आणि साहित्य प्रकाशन यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘अखंड भारताच्या’ सांस्कृतिक' पुनरुत्थानाला मोठे प्रोत्साहन दिले आहे.
या मंगल प्रसंगी श्री अरबिंदो आणि श्रीमाँ यांना विनम्र अभिवादन करून, भारताच्या सांस्कृतिक वारशावर आधारित आध्यात्मिक चळवळीचा प्रकाशस्तंभ म्हणून हा आश्रम निरंतर मार्गदर्शन करीत राहो आणि आपली सांस्कृतिक व आध्यात्मिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात यशस्वी होवो, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
दत्तात्रेय होसबाळे
सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ




