Breaking
Loading latest news...
Personality

ब्रह्मचारिणी देवी - श्री रवींद्र पांडे

📅 12 Oct 2026 ✍️ Admin Editor 👁 10 views
ब्रह्मचारिणी देवी - श्री रवींद्र पांडे
*देवी नवरात्रोत्सव चा दुसरा दिवस :-  ब्रह्मचारिणी देवी*

        *आज नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस.हा दिवस देवी ब्रह्मचारिणी ला समर्पित आहे.ज्ञान, वैराग्य आणि ध्यानाची अधिष्ठात्री ब्रह्मचारिणी देवी आहे. माता दुर्गा देवी शक्तीचे दुसरे रूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी.ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्चर्या असा होतो.जो तपस्या करतो.ब्रह्मचारिणी म्हणजे तपाची चाचणी*
       *ब्रह्मचारिणी देवी ही पुर्व जन्मी हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली होती. नारदांच्या उपदेशाने भगवान शंकराला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती.या तपश्चर्यामुळेच या देवीचे नाव ब्रह्मचारिणी देवी असे पडले.*
         *असे म्हटल्या जाते की,या देवीने जवळपास तीन हजार वर्षे तपश्चर्या केली.ही तपश्चर्या फक्त कंदमुळे आणि फळे खाऊन केली.त्यातील‌ काही दिवस तर काहीच न खाता बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली.या कठोर तपश्चर्यामुळेच तिला तपश्चरिणी म्हणजे ब्रह्मचारिणी असे नाव पडले.*
       *या देवीच्या तपश्चर्याची खुद्द पितामह ब्रह्माजी यांनी कौतुक केले.तसेच तुझ्या या तपश्चर्याने तुझ्या सर्व इच्छा, मनोकामना पुर्ण होतील.तसेच भगवान शंकर पती रूपात निश्चित मिळेल.आता तपश्चर्या सोडून लवकर घरी परत जा अशी आकाशवाणी झाली.*
          *या देवीचे दुसरे नाव " उमा " असेही आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या कठोर तपश्चर्या मुळे शारीरिकदृष्ट्या अत्यंत अशक्त झाली होती.ही अवस्था पाहून ब्रह्मचारिणी देवी ची माता मेना अतिशय दुःखी झाली होती. देवीची अवस्था या मातेकडून पाहावल्या जात नव्हते.या देवीला तपश्चर्या पासून परावृत्त करण्यासाठी माता मेना यांनी " उमा " म्हणून हाक मारली.*
         *देवी ब्रह्मचारिणीने  तपश्चर्या कालावधीत तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर जमिनीवर पडून असलेली पाने खाऊन जवळपास हजार वर्षे भगवान शंकराची पुजा केली.त्यामुळे या देवीला " अर्पण " या नावाने सुध्दा ओळखले जाते.*
         *ब्रह्मचारिणी देवीचे रूप *अत्यंत तेजस्वी आणि भव्य आहे.या देवीच्या उजव्या हातात नाम जपाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण करून पांढरी वस्त्रे परिधानकेलेली आहेत.या देवीच्या उपासनेच्या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर असते.उपासना केल्याने तप,संयम,त्याग, सद्गुणांची प्राप्ती होते.तसेच व्यक्ती अत्यंत कठीण परिस्थितीतही कर्तव्यापासून विचलित होत नाही,तो विजयी होतो असे म्हटले आहे.*
       *आज देवी ब्रह्मचारिणी चा नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस समर्पित आहे. आपल्याला आणि आपल्या परिवाराला नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.*

*-- संकलनकर्ता* 
*-- रवींद्र गोविंद पांडे*
*-- भ्रमणध्वनी क्र - ९३२५४५७०५२*

Related Articles