कुष्मांडा देवी. - श्री रवींद्र पांडे
देवी नवरात्रोत्सव चा चौथा दिवस :- कुष्मांडा देवी.
आज नवरात्रोत्सवातील चौथा दिवस.हा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित.या दिवशी साधकाचे मन अदाहत चक्रात स्थिर झालेले असते. सृष्टीचे अस्तित्व नव्हते या देवीने आपल्या स्मित हास्याने ब्रम्हांड उत्पन्न केल्यामुळे, ब्रम्हाडाची रचना केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. या देवीला सृष्टीची आद्य शक्ती असेही म्हणतात.
कुष्मांडा देवीला आठ हात आहे.म्हणून या देवीला अष्टभुजा देवी म्हटले जाते.या देवीच्या आठ हातात कमंडलू, धनुष्य बाण, कमळ पुष्प शंख, चक्र,गदा आणि एका हातात सर्व सिध्दी आणि संपत्ती प्रदान करणारी जपमाळ आहे. या सोबतच अमृताच्या कलश आहे. धार्मिक मान्यते नुसार कुष्मांडा देवी ही दुर्गा देवीचे चौथे रूप आहे. कुष्मांडा देवी ही अशी एकमेव देवी आहे की,सूर्यमंडलाच्या आतील लोकांत निवास करते.यावरून या देवीचे तेज सुर्या पेक्षा कितीतरी जास्त असावे हे लक्षात येते.या तेजाने दशदिशा व्यापलेल्या आहेत.
*देवी पुराणानुसार एकेकाळी संपूर्ण विश्वात अंधार होता.देवीच्या दिव्य तेजाने संपूर्ण विश्व प्रकाशित झाले.या प्रकाशाने पृथ्वीवर सूर्य, तारे,ग्रह, आकाशगंगा, नद्या,तलाव,झाडे ,पर्वत निर्माण झाले.त्यानंतर इतर सजीवांची निर्मिती झाली. अशाप्रकारे कुष्मांडा देवीने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली असे म्हटले जाते.
*या देवीची पुजा केल्याने सर्व दुःख आणि पापं दुर होतात तसेच आयुष्य, कीर्ती आणि आरोग्य चांगले राहते अशी भक्तांची श्रद्धा आहे. या देवीला तृष्णा आणि तृप्ती चे कारण मानले जाते.*
*आज कुष्मांडा देवीचा नवरात्रोत्सवातील चौथा दिवस समर्पित आहे. आपल्याला आणि आपल्या परिवाराला नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.*
*-- संकलनकर्ता*
*-- रवींद्र गोविंद पांडे*
*-- भ्रमणध्वनी क्र -९३२५४५७०५२*




