देवी चंद्रघंटा - श्री रवींद्र पांडे
देवी चंद्रघंटा - श्री रवींद्र पांडे
*देवी नवरात्रोत्सव चा तिसरा दिवस :- चंद्रघटा देवी*
*आज नवरात्रोत्सवातील तिसरा दिवस.हा दिवस चंद्रघटा देवी ला समर्पित आहे.देवी चंद्रघटा ही देवी पार्वतीचे एक विवाहित रूप आहे.भगवान शिवाशी विवाह केल्यानंतर देवीने आपल्या कपाळावर अर्धचंद्र कुंकू लावण्यास सुरुवात केली. म्हणून देवी पार्वती ही चंद्रघटा देवी म्हणून ओळखली जाते.*
*देवीचे रूप हे शांती दायक आणि कल्याणकारी आहे.देवी चंद्रघटाचे स्वरूप ही देवी दशभुजा आहे. देवीला एकूण दहा हात आहे. डाव्या बाजूला असलेल्या चार हातात त्रिशूळ,गदा, तलवार आणि कमंडलू तसेच वरद मुद्रा मध्ये पाचवा हात आहे.तसेच उजव्या भागातील चार हातात कमळ,बाण, धनुष्य आणि जपमाळ.तसेच पाचवा हात अभय मुद्रा मध्ये असतो. गळ्यामध्ये फुलांचा हार, कानात सोन्याचे आभूषण, डोक्यावर मुकुट राहतो.
या देवीचे वाहन सिंह आहे.वाहन सिंह असल्याने या देवीचे भक्त पराक्रमी निर्भय असतात असे म्हणतात.या देवीची मुद्रा उग्र जरी असली तरी ती केवळ दुष्ट,असुर, विध्वंसक शक्तीचा नाश करण्यासाठी आपल्या उग्र शक्तीचा उपयोग करते.तर सज्जन,भक्त यांच्यासाठी ती संरक्षक कवच म्हणून ओळखली जाते.
पौराणिक कथेनुसार, राक्षसांचा क्रूरपणा वाढायला लागला तेव्हा देवी दुर्गाने चंद्रघटाचा अवतार घेतला. त्यावेळी देवतांचे महिषासुरा सोबत युद्ध सुरू होते. महिषासुरला स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवराज इंद्राचे सिंहासन मिळवायचे होते. त्यासाठी हे युद्ध सुरू होते. युध्दाचे खरे कारण समजल्यानंतर सर्व देव अस्वस्थ झाले.ते ब्रम्हा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले. युध्दाचे खरे कारण देवतांनी सांगितल्या वर ब्रम्हा विष्णू आणि महेश हे क्रोधित झाले.त्याचवेळेस त्यांच्या तोंडातून एक उर्जा बाहेर पडली.त्या उर्जतून एक देवी अवतरली. त्यावेळी भगवान शंकराने आपला त्रिशूळ, भगवान विष्णू ने आपले चक्र, इंद्रदेवाने आपली घंटा सुर्याने आपले तेज, तलवार आणि सिंह चंद्रघटा देवी ला दिले.त्यानंतर देवी चंद्रघटाने महिषासुराचा वध करून देवांचे रक्षण केले.
या देवीची पूजा केल्याने भक्तांचा आत्मविश्वास वाढतो. अन् आत्मविश्वास वाढल्याने त्या भक्ताला आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. न्याय आणि अनुशासन रूजवीणारी चंद्रघटा देवी आहे असे म्हटले जाते.या देवीची आराधना केल्यास वीरता , निर्भयता याबरोबर सौम्यतेचा विकास होत त्याचा भक्ताला फायदाच होतो.इहलोक आणि परलोक दोन्हींच्या कल्याणकारी आणि समृद्धी हे देवीचे लक्ष असते.
आज चंद्रघटा देवी चा नवरात्रोत्सवातील तिसरा दिवस समर्पित आहे. आपल्याला आणि आपल्या परिवाराला नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.*
*-- संकलनकर्ता*
*-- रवींद्र गोविंद पांडे*
*-- भ्रमणध्वनी क्र - ९३२५४५७०५२*




