देवी स्कंद माता - श्री रवींद्र पांडे
*देवी नवरात्रोत्सव चा पाचवा दिवस :- स्कंद माता देवी*
*आज नवरात्रोत्सवातील पाचवा दिवस.या दिवशी स्कंद माता देवीची पूजा केली जाते.दुर्गा देवीचा पाचवा अवतार म्हणजे स्कंद माता देवी.स्कंदमाता भक्तांना सुख - शांती प्रदान करणारी देवता आहे.देवासुर संग्रामाचे सेनापती भगवान स्कंदची आई असल्याने दुर्गा देवीच्या पाचव्या रूपाला स्कंदमाता नावाने ओळखली जाते.एका पौराणिक कथेनुसार,एक तारकासुर नावाचा राक्षस होता.या राक्षसाने निरपराध लोकांवर अनंत अत्याचार केलेत.लोकां वरील अत्याचाराचे प्रमाण दिवसें दिवस वाढत आणि गंभीर होत चालले होते. राक्षसाने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. राज्यातील प्रजा ही या अत्याचाराला कंटाळली होती .या राक्षसाचा वध करणे खुप गरजेचे होते. पण या राक्षसाला शिवपुत्र च मारू शकत होता.हे लक्षात आल्या नंतर मा॑ पार्वतीने आपला मुलगा स्कंद ला - ज्याचे दुसरे नाव कार्तिकेय असेही आहे - युध्दाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यासाठी स्कंद मातेचे रूप धारण केले.युध्दाचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यावर कार्तिकेय ने तारकासुर राक्षसांचा वध केला.
स्कंद मातेचा निवास डोंगरावर रहात होता. भगवान कार्तिकेय सिंहावर स्वार होऊन माता स्कंद मातेच्या मांडीवर विराजमान रहात असे. देवी स्कंदमाता ही सूर्यमालेची प्रमुख देवता मानली जाते. स्कंद मातेला तीन डोळे आणि चार हात आहेत. त्यापैकी दोन हातात कमळ असून इतर दोन हातामध्ये अनुक्रमे रक्षण आणि प्रदान मुद्रा प्रदर्शित करतात. स्कंदमाता ही अपार क्षमता असलेल्या मुलाची आई म्हणून तीची पूजा केली जाते.मा स्कंद मातेची पुजा करतांना भगवान कार्तिकेय मातेच्या मांडीवर विराजमान रहात असल्याने त्याची पुजा आपोआपच होऊन जाते.
स्कंद माता विविध नावांनी ओळखली जाते.देवी स्कंदमाता ही हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जाते.तसेच ती महादेवाची पत्नी असल्याने माहेश्वरी हे नावही पडले.ही देवी चा वर्ण गोरा असल्याने तीला गौरी असेही म्हणतात.ती कमळाच्या फुलावर बसल्याने तिला पद्मासन असेही म्हणतात. तसेच स्कंद माता विद्या वाहिनी म्हणून ओळखली जाते. स्कंदमाता देवीची पूजा केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
अशा या स्कंद माता देवीचा आज नवरात्रोत्सवातील पाचवा दिवस समर्पित आहे. आपल्याला आणि आपल्या परिवाराला नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.*
*-- संकलनकर्ता*
*-- रवींद्र गोविंद पांडे*
*-- भ्रमणध्वनी क्र - ९३२५४५७०५२*




