Breaking
Loading latest news...
Views

श्री कात्यायनी देवी -रवींद्र पांडे

📅 16 Oct 2026 ✍️ Admin Editor 👁 8 views
श्री कात्यायनी देवी -रवींद्र  पांडे
देवी नवरात्रोत्सव चा सहावा दिवस :- कात्यायनी देवी

          नवरात्रोत्सवातील सहाव्या दिवशी कात्यायनी देवी ची पूजा केली जाते.ही देवी दुर्गा देवीचा सहावा अवतार असल्याचे सांगितले जाते.कत महर्षी चा पुत्र कात्या ऋषींच्या कन्या म्हणून कात्या कुळात जन्मल्यामूळे कात्यायनी हे नाव पडले असे म्हणतात. ऋषींनी या देवीचे पूजन केल्यावर दशमीच्या दिवशी या देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला आणि तिचे नाव महिषासुरमर्दिनी असे पडले.
          भगवान कृष्णाच्या कालखंडात कात्यायनी देवीचे प्राबल्य होते. कृष्णाच्या गोकुळातील गोपी आणि गोपा या देवीची पूजा करीत असत.श्री कात्यायनी देवीची प्रतिमा मातीच वापर करून तयार केली जात होती.या प्रतिमेची केलेल्या पूजेला कात्यायनी व्रत म्हणून ओळखले जाते. व्रत पूर्ण झाल्यावर कात्यायनी देवीची मातीची प्रतिमा यमुना नदीत विसर्जन केले जात होती.
         कात्यायनी देवी मध्ये ब्रम्हा विष्णू आणि महेश यांची एकत्रित शक्ती असल्याचा उल्लेख काही धर्मग्रंथात आढळतो.  कात्यायनी देवी चतुर्भुजा असून उजव्या बाजू कडील वरील एक हात अभय मुद्रा प्रदर्शित करते.तर उजव्या बाजू्कडीलच खालचा हात वर मुद्रा दर्शवते. तसेच डाव्या बाजूकडील वरच्या हातात कमळ असून तर खालच्या हातात खड्ग आहे. धर्म,अर्थ, काम,मोक्ष या पुरूषार्थाची प्राप्ती या देवीची उपासना केल्यास प्राप्त होते असे म्हणतात.
           या कात्यायनी देवीचा आज नवरात्रोत्सवातील सहावा दिवस समर्पित आहे. आपल्याला आणि आपल्या परिवाराला नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

*-- संकलनकर्ता* 
*-- रवींद्र गोविंद पांडे*
*-- भ्रमणध्वनी क्र - ९३२५४५७०५२*

Related Articles