Breaking
Loading latest news...
Views

श्री कालरात्री देवी - श्री रवींद्र पांडे

📅 17 Oct 2026 ✍️ Admin Editor 👁 8 views
श्री कालरात्री देवी - श्री रवींद्र पांडे
देवी नवरात्रोत्सव चा सातवा दिवस :- कालरात्री देवी

          आज नवरात्रोत्सवातील सातवा दिवस.या दिवशी कालरात्री देवीची पूजा,उपासना केली जाते.कालरात्री देवी ही दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी एक म्हणजे सातवे रूप आहे.

         एकदा शुंभ आणि निकुंभ आणि रक्तबीज या  राक्षसांनी तीनही लोकांत हैदोस घालणे सुरू केले. त्यावेळी सर्व देवता गण भगवान शिवा जवळ गेले.सर्व देवतांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता ते फार चिंतातूर असल्याचे भगवान शिवाच्या लक्षात आले.सर्व देवतांनी या राक्षसाविषय ची  माहिती दिली.अन् कसेही करून या राक्षसांचा हैदोस थांबवावा अशी भगवान शिवाकडे याचना केली.

         भगवान शिवाने बाजूलाअसलेल्या माता पार्वतीकडे पहात या राक्षसांचा वध करण्याची प्रार्थना केली.माता पार्वतीने पण भगवान शिवाच्या प्रार्थनेला सहमती दर्शवत नतमस्तक होऊन राक्षसांचा वध करायला निघाली. माता पार्वतीने राक्षसांचा वध करण्यासाठी मा दुर्गाचा अवतार घेतला.आपल्या सिंह असलेल्या वाहनावर आरूढ होऊन माता पार्वती निघाली. मा दुर्गादेवीला पाहून तीनही राक्षस अचंबित झाले.मा दुर्गादेवी सोबत या तिनही राक्षसांसोबत युद्ध सुरू झाले. परंतू मा दुर्गादेवी समोर या तिनही राक्षसांचा मात्र टिकाव लागत नव्हता. देवीने शुभं आणि निशुंभ यांचा वध केला.

         त्यानंतर रक्तबीज हा राक्षस बाकी होता.रक्तबीज ला  कठोर तपश्चर्या करून ब्रम्हा कडून अमरत्वाचा वरदान मिळाले होते. रक्तबीज ला मारायला जो कोणी येत असे तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताचे बुंद जमीनीवर पडत होते.अन् पडलेल्या रक्ताच्या प्रत्येक बुदांमधून नवीन रक्तबीज चा जन्म होत होता. मा दुर्गादेवीला हे माहीत असल्याने देवीने कालरात्री चे रूप धारण केले. रक्तबीज राक्षस अत्यंत शक्तीशाली मानला जात होता.परंतू कालरात्री देवीसमोर लढण्याची ताकद, सामर्थ्य नव्हते. कालरात्री देवीने आपल्या हातात असलेल्या कट्यार शस्त्राने रक्तबीज राक्षसाचा वध केला.अशी आख्यायिका सांगितली जाते.
         कालरात्री देवीच्या शरीराचा रंग दाट अंधाराप्रमाणे गडद आहे. डोक्यावरील केस विखुरलेले आहेत.गळ्यात विजेसारखी एक चमकणारी माळ आहे. चार भुजा असलेल्या देवी कालरात्री ने आपल्या डाव्याबाजूला असलेल्या हातात लोखंडी काटा आणि तलवार ( खंजीर ) तर उजव्या बाजूला असलेला वरचा हात वर मुद्रा स्थितीत आहे तर खालच्या या हात अभय मुद्रा मध्ये आहे. देवीचे रूप फारच भयंकर आहे. असे असले तरी तीची उपासना केल्यास शुभ परिणाम मिळतात. म्हणून या देवीला शुभंकारी असेही म्हणतात.
        अशा या कालरात्री देवी चार आज नवरात्रोत्सवातील सातवा दिवस समर्पित आहे. आपल्याला आणि आपल्या परिवाराला नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवसच्या हार्दिक शुभेच्छा.

- संकलनकर्ता
-- रवींद्र गोविंद पांडे
- भ्रमणध्वनी क्र - ९३२५४५७०५२

Related Articles