श्री महागौरी देवी - श्री रवींद्र पांडे
देवी नवरात्रोत्सव चा आजचा आठवा दिवस :- महागौरी देवी
आज नवरात्रोत्सवातील आठवा दिवस.या दिवशी महागौरी देवीची पूजा, उपासना केली जाते.श्री महागौरी देवी हे दुर्गा देवीचे आठवे रूप आहे. महागौरी देवीला उज्ज्वला स्वरूपा महागौरी,धन ऐश्वर्या प्रदायानी,चैतन्यमाई त्रैलोक्य पूज्य मंगला, शारीरिक, मानसिक आणि सांसारिक त्रास दूर करणारी माता या विविध नावाने ओळखली जाते.या देवीला तेजस्वी प्रकाशाची देवी असेही म्हणतात.
महागौरी देवी संबंधी दोन कथा सांगितल्या जातात.
१) देवी पार्वती ने भगवान शंकर आपल्याला पती म्हणून मिळावे यासाठी कठोर तपश्चर्या केली होती.या कठोर तपश्चर्या मुळे माता पार्वती चे शरीर काळे ठिक्कार पडले होते.सूर्यप्रकाश आणि हवामानाच्या प्रभावाने देवीचे शरीर काळ्या रंगात बदलले. माता पार्वतीने केलेल्या तपश्चर्यावर भगवान शिव प्रसन्न झाले.अन् माता पार्वती वर पवित्र गंगेचा प्रवाह सोडला ज्यामुळे शरिरावरील काळे डाग पुर्णपणे निघाले. त्यानंतर देवीचे संपूर्ण शरीर गौरवर्ण झाले.देवी मोठ्या तेजाने चमकली. तेव्हापासून माता पार्वती ला महागौरी देवी म्हणून ओळखले जाते.
२) एका सिंहाला जोरदार भुख लागली तेव्हा भोजन कुठे मिळते का याचा शोध घेत असतांना महागौरी देवी ज्याठिकाणी तपश्चर्या करीत होती तिथे सिंह पोहोचला. परंतू देवी तपश्चर्या करीत असल्याचे लक्षात आले तेव्हा सिंह देवीची तपश्चर्या संपण्याची वाट पहात बसला. यात काही वर्ष निघून गेली. तपश्चर्या संपल्यावर देवी जेव्हा उठली तेव्हा या सिंहाची हालत पाहून दया आली. महागौरी देवीने त्या सिंहाने आपल्यासोबत तपश्चर्या केली म्हणून सिंहालाच आपले वाहन बनवले.तेव्हापासून महागौरी देवीचे बैल आणि सिंह हे दोन्ही वाहन बनले.
महागौरी देवीच्या त्वचेचा रंग गोरा तर आहेच त्याचबरोबर तिचे वस्त्र वाहन बैल आणि सिंह हे सुद्धा पांढरे आहेत.देवीला चार भुजा आहेत.देवीच्या वरच्या उजव्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात त्रिशूळ धारण केले आहे.तसेच वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या हातात वर मुद्रा आहे.महागौरी देवी आपल्या भक्तांना सकारात्मक मार्गावर घेऊन जाते.सकारात्मक ऊर्जाही वाढते.
अशा या महागौरी देवीचा आज नवरात्रोत्सवा तील आठवा दिवस. आपल्याला आणि आपल्या परिवाराला नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा
*-- संकलनकर्ता
*-- रवींद्र गोविंद पांडे
*-- भ्रमणध्वनी क्र - ९३२५४५७०५२*




