श्री शैल पुत्री - रवींद्र पांडे
*दुर्गा नवरात्रोत्सव चा पहिला दिवस.:- देवी शैलपुत्री*
*आजपासून देवी शारदीय नवरात्रौत्सव सुरू झाला.तो दशमी पर्यंत म्हणजे दसऱ्या पर्यंत सुरू राहील. हा नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो.*
*असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती तसेच लाभदायक गोष्टींसाठी हा एक कालावधी चांगला मानला जातो.नऊ दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी यशस्वी लढा देण्यासाठी च नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले आहे.*
*या नऊ देवीच्या रूपांची पूजा अर्चना करण्यात येते. या नऊ देवीं मध्ये पहिला दिवस शैलपुत्री देवीचा असतो.या शैलपुत्री देवीची नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुजा केली जाते.*
*हिंदू पौराणिक कथेनुसार,देवी शैलपुत्रीचा जन्म हिमालयाचा शासक राजा हिमवनाची कन्या, पार्वती म्हणून ओळखली जाते.ती सती नावाने या सुध्दा ओळखली जाते. सती ही भगवान शिवाची पत्नी होती. परंतू आयुष्यात अनेक भयंकर प्रसंगामुळे तिने अग्नी यज्ञात आत्मदहन केले.नंतर तिचा परत जन्म झाला तेव्हा तिचे नाव शैलपुत्री होते. भगवान शिवाच्या भक्तीमुळे ती भगवान शिवाची परत जोडीदार बनली.*
*शैलपुत्री देवी नंदीवर स्वार झालेली तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ धारण केलेले असते. शैलपुत्री देवीचा शांत स्वभाव असल्यामुळे ती निसर्गाच्या सामर्थ्याचे आणि पोषण गुणांचे प्रतिक मानली जाते.या देवीचे भक्त नवरात्रात उपासना करून भक्तांच्या जीवनात स्थिरता आणि सामर्थ्य प्राप्त व्हावे यासाठी तिची पुजा करतात. अशी ही दंतकथा सांगितल्या गेली आहे.*
*देवी शैलपुत्री दुर्गादेवीचे पहिले रूप आहे असे म्हटले जाते.तिची पुजा "ॐ देवी शैलपुत्र्यै नमः " या मंत्राने केली जाते.*
*आज देवी शैलपुत्री चा नवरात्रोत्सवातील पहिला दिवस.आपल्याला आणि आपल्या परिवाराला घटस्थापनेच्या देवी नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.*
*-- संकलनकर्ता*
*-- रवींद्र गोविंद पांडे*




