श्री सिद्धिदात्री देवी - श्री रवींद्र पांडे
देवी नवरात्रोत्सव चा आजचा नववा दिवस :- सिद्धिदात्री देवी
आज नवरात्रोत्सवातील नववा दिवस.या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा, उपासना केली जाते. सिद्धिदात्री देवी दुर्गा देवीचे नववे रूप आहे. या देवीला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त आहे असे म्हटले जाते. पुराणामध्ये अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राकाम्य, ईशित्व प्राप्ती आणि वशित्वये अशा आठ प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाली असल्याचे सांगितले जाते.सिद्धि म्हणजे अलौकिक शक्ती तसेच ध्यान करण्याची क्षमता आणि दात्री म्हणजे दाता,देणारा असा या देवीच्या नावाचा अर्थ आहे. या देवीचे वाहन सिंह असून ती कमळावर विराजमान आहे.
सिद्धिदात्री देवीचे रूप एकदम साधे आहे.या देवीला चार भुजा आहेत.या चारही हातात चक्र,गदा,शंख आणि कमळाचे फूल आहे. पुराणा नुसार भगवान शिवाने याच देवीच्या कृपेने सिद्धी प्राप्त केली होती.तसेच पुराणात एकूण १८ सिद्धी असल्याचा उल्लेख आहे.त्या सर्व सिद्धींची ही देवी स्वामिनी आहे असे म्हटले जाते.सर्व देवता, ऋषी मुनी राक्षस नाग तसेच मनुष्य हे सर्वजण या सिद्धिधात्री देवीचे भक्त आहेत.
भगवान शिवाची एक बाजू सिद्धिदात्री देवीची आहे.त्यामुळे त्यांना अर्धनारीश्र्वर या नावाने ओळखले जातात.या देवीच्या उपासनेनंतर नवरात्रोत्सवाची सांगता होते.
- संकलनकर्ता
- रवींद्र गोविंद पांडे
- भ्रमणध्वनी क्र - ९३२५४५७०५२*




